SMILE INSTITUTE OF CHILD HEALTH
&
AKOLA TEST TUBE BABY CENTRE

 

बाळाचा पूरक आहार

Author:
Short Description: बाळाला लागणारी आवशक पादार्थ १ . दुध पाजण्यासाठी बोतालचा वापर करू नये, व नेहमी वाटी व चमचा वापरावे. २. अंगावरचे दुध दीड ते दोन वर्षापर्यंत पाजावे.बाळाला लागणारी आवशक पादार्थ 

१ . दुध पाजण्यासाठी बोतालचा वापर करू नये, व नेहमी वाटी व चमचा वापरावे.

२. अंगावरचे दुध दीड ते दोन वर्षापर्यंत पाजावे.

३. सहा महिन्यापर्यंत फक्त अंगावरचे दुध पाजावे, आणि सहा महिन्यानंतर वरची पातळ पादार्थ सुरु करावे. त्यानंतर आहारातील घट्टपणा पुढच्या        सहा महिन्यात वाढवावे, आणि दोन ते चार दिवसाला नवीन पादार्थ सुरु करावे. 

४. आहाराचा घट्टपणा वाढवण्याकरिता तेल, तूप, किंवा गुळ साखरेचा वापर करावा.

५. बाळाच्या आहारामध्ये फळांच्या व हिरव्या भाजीपाल्यांचा भरपूर प्रमाणात उपयोग करावा.

६. बलाचा आहार चवदार बनवणे. 

७. तीन वर्षा खालील बाळाला शेंगदाणे व फुटाने बारीक करून दयावे जेणे करून श्वास नलिकेत अडकण्याची भीती राहणार नाही.

८. वरचे दुध (गाय, म्हैस, व पावडरचा डब्बा) एक वर्षा नंतर वापरावे वरचे दुध जास्त प्रमाणात देऊ नये.

९. एक वर्षा नंतर बाळाला कौटुंबीक आहार दयावे व एक ते तीन वर्षा पर्यंत बाळाला कुटुंबासोबत बसायला लावायचे.

१०. बाळ जस-जसा मोठा होतो तस-तसे त्याला स्वतःच्या हाताने जेवणाची सवय लावावी.

११. आजारावरून दुरुस्त झाल्यानंतर बाळाला एक ते दोन आठवडे भरपूर जेवण देणे, जेणे करून आजारामध्ये असतांना बाळाचे कमी झालेल्या    वजनात वाढ होईल. 

१२. भिस्कीट, चोकलेट, चिप्स, म्यागी, चिवडा असे पादार्थ बाळाला देण्यास टाळावे. 

१३. बाळाला जबरदस्ती जेवण कधीही देऊ नये.

१४. नेहमी आहारात घरेलू पादार्थ वापरावे. 

१५. गरम थंड व आंबट अशा पदार्थावर ग्यैर समाज करू नये.

 

सहा महिन्या आतील बाळाला लागणारी पादार्थ 

* बाळाला पाणी उकळून थंड केलेले पाजावे.

* खाण्यामध्ये डाळीचे पाणी पिण्याला देणे.

* खिचडी व भाताचे व डाळीचे पाणी देणे.

* सर्व फळांचे रस.

* केली आणि दुध मिक्स करून देणे.

* उकळलेली आलू बाळाला खायला देणे.

 

सहा महिन्यानंतर बाळाला खायला चालणारी पदार्थ

* पोळी / ब्रेड 

* शिरा 

* रव्याचा उपमा 

* पोहा 

* सुजी 

* पातळ खीर 

* इडली, डोसा 

* दुध, दही, केली यांची लस्सी बनवून देणे.