SMILE INSTITUTE OF CHILD HEALTH
&
AKOLA TEST TUBE BABY CENTRE

 

भावनात्मक बुद्धिम

Author:
Short Description: भावनात्मक बुद्धिमत्ता १८/०५/२०१७
             भावनात्मक बुध्दीमत्ता

भावनात्मक बुध्दीमत्ता म्हनजे काय ?

भावनात्मक बुध्दीमत्ता म्हणजे EQ : भावना ओळखण्याची , समजून घेण्याची आणि भावनांचा योग्य उपयोग करून तणाव करण्याची क्षमता . परिणामकारक वार्तालाप करणे , समस्या दूर करुण यश प्राप्त करणे आणि इतरांशी चांगले संबंध निर्माण करून ते टिकून ठेवणे म्हनजे भावनात्मक बुध्दीमत्ता . यश प्राप्त करण्यासाठी IQ (intelligence quotient) पेक्षा EQ 

(emotional Quotient) जस्त महत्वाचे आहे असे मानसिक रोग तज्ञ डनेल  गोल्डमन यांनी शोधून काढले आहे .

मागील दहा वर्षापासून आपण असे समजतो आहे कि फक्त बुद्धिमान व्यक्तीच यश प्राप्त करू शकतात पण आजच्या युगात हे पूर्णतः सत्य नाही. सध्याच्या संशोधनातून असे निदर्शनास आले आहे कि फक्त २५ % यश आपण आपल्या बुद्धिमत्तेमुळे प्राप्त करू शकतो. अशी कुठली गोष्ठ आहे जे IQ पेक्षा श्रेष्ट आहे .ते आपण एका उदाहरणावरून पाहू.

अडव्होकेट राम आणि अढओकेट श्याम हे दोन वकील होते.त्यांच्यामध्ये आडव्होकेट राम हे खूप बुद्धिमान आणि शिक्षणात सुद्धा अव्वल होते. त्यांचे काबीन फार सुंदर होते. त्याचबरोबर ते मार्केटिंग सुद्धा जोमाने करीत होते पण त्यांचा व्यवसाय पाहिजे तसा चालत नव्हता. कारण ते उद्धटपणे बोलत असे, क्लायटसला जस्त वेळ देत नसत आणि त्यांच्या तक्रारीकडे लक्ष देत नसे. दुसरे वकील शाम हे शिक्षणात अव्वल नव्हते पण ते स्वभावाने खूप छान आणि मनमिळाऊ होते. त्यांच्या क्लायटसचे ते आवडीचे वकील होते .त्यांचे क्लायटस त्यांच्याबद्दल समाधानी असत. ते त्यांच्या बोलण्यामुळे यशस्वी आणि  लोकप्रिय झाले होते.

अस काय होत जे शं कडे होते  आणि राम कडे नव्हते. त्याला आपण स्मार्टनेस किंवा व्यक्तिमत्वामधील फरक म्हणू शकतो.नुकत्याच झालेल्या संशोधनातून असे निदर्शनास आले कि भावनात्मक बुद्धिमत्तेमुळे आपण इतरांशी चांगले संबंध निर्माण करू शकतो .आपल्या क्षेत्रामध्ये खूप यश प्राप्त करू शकतो आणि परिपूर्ण जीवन जगू शकतो.

भावनात्मक बुद्धीमत्तकात खालील पाच गोष्टी समाविष्ट असतात.

१)स्वजागरुकता : म्हनजे,जागृक राहण्याचे आणि आपल्या भावनांना समजून घेण्याचे कौशल्य होय.भावना म्हनजे आपल्या डोक्यातील विचार आणि आपल्या संपूर्ण शरीरावरील हावभाव .

भावनांचे चार प्रकार आहे.

अ)मुख्यभावना : ज्या आठ प्रकारच्या आहे.आनंद, दुख,भीती,आश्चर्य,स्वीकारकरणे, तिरस्कार, विरोधी भावना आणि सर्वात महत्वाचा राग .   

ब) सामाजिक भावना :उदा. एखादी आश्चर्याची गोष्ट कानावर आल्यास डोळ्यांच्या भुवया उंचावतात,डोळे पूर्ण उघडले जातात, कपाळावर वाल्या पडतात, जबडा आकुंचित होतो आणि तोंड उघडले जाते .

क) शारीरिक भावना : उदा. आपल्याला भीती वाटली असता हृदयाचे ठोके वाढतात.रक्तदाब वाढतो. आपण उथळ श्वास घेतो आणि मेंदूतील रसायनाची(N eurochemicals) पतळी वाढते.

ड) उदा. आपल्याला राग येतो तेव्हा आपण आखाड्याशी बोलणे बंद करतो किंवा ओरडून आपण राग व्यक्त करतो वस्तूंची तोडफोड करतो किंवा आपण हिंसात्मक होतो.

२)सहानुभुती : दुसर्यांबरोबर चांगले संबध निर्माण करण्यासाठी सहानुभुती हा एक पाया आहे. सहानुभूती म्हणजे दुसर्यांच्या गरजा आणि त्यांच्या विचाराबद्दल जाग्रुकता असणे तसेच दुसर्यांच्या दृष्टीकोनातून गोष्टींकडे पाहण्याची क्षमता. दोन्ही डोळ्यांनी आणि कानांनी दुसऱ्यांच म्हणन ऐकून घ्यायला शिकलं पाहिजे. प्रश्न विचारून दुसर्यांबद्दल व त्यांच्या विचारांबाद्दल् जास्तीत जस्त जाणून घेतले पाहिजे.दुसर्यांच्या भावनांचा आदर केला पाहिजे. दुसरयावर टिप्पणी करणे टाळले पाहिजे. 

३) सामाजिक कौशल्य : म्हणजे समूहामध्येकाम करण्याचे, प्रश्न सोडविण्याचे,कामामध्ये सातत्य ठेवण्याचे कौशल्य.इतरांशी चांगला संवाद साधण्यासाठी चांगल्या संधीपर्यंत पोहचण्यासाठी, विश्वासपात्र होण्यासाठी सामाजिक कौशल्य असणे म्हत्वाचे आहे.

४)स्वनियामितता : म्हणजे परिणामकारकपणे व गांभीर्याने आपल्या भावनांना हाताळण्याची क्षमता.आपण स्वतावर नियंत्रण ठेवणे शिकलो पाहिजे. त्यामुळे आपल्या भावना योग्य आणि मर्यादित राहतील.

उदा. एखादया  व्यक्तीची मृत्युची बातमी सांगतांना आपल्याला दुख्खी मनस्तितीत असणे गरजेचे असते.आपण नेगेटिव स्तीतीचे पोसीटिऊ स्तीतीम्ध्ये परिवर्तन केले पाहिजे त्यामुळे तणाव कमी होईल. उदा. एखाद्या राग आलेल्या व्यक्तीशी बोलतांना जो कि तुमच्याशी उद्धटपणे बोलतो आहे त्याचाशी बोलतांना रागाने न  बोलता, शांत राहून तत्काळ प्रश्न सोडविला पाहिजे.

५)प्रेरणा : म्हणजे स्वतःमध्ये सुधारणा करण्यासाठी , आपले ध्येय गाठण्यासाठी तसेच योग्य संधीचा फायदा घेण्यासाठी आपल्या भावनांचा उपयोग करण्याची क्षमता.कुठल्या भावनांमुळे आपले सामर्थ्य वाढते व आपल्याला पाहिजे तो परिणाम मिळण्यासाठी भावनांचा कसा उपयोग करावा हे आपल्याला अभ्यासातून समजू शकते.