HOW MUCH WATER DO CHILDREN NEED TO DRINK DAILY?
HOW MUCH WATER DO CHILDREN NEED TO DRINK DAILY?
11 Feb, 2023
मुलांना दररोज किती प्रमाणात पाणी पिणे आवश्यक असते?
मानवी शरीर हे ७०% पाण्या पासून बनलेले असते. शाररिक व मानसिक आरोग्य चांगले ठेवण्या करता योग्य प्रमाणात पाणी पिणे आवश्यक असते. लहान मुलांमध्ये तर हा विषय फारच जास्त महत्त्वाचा असतो, कारण की त्यांचे तहान लागण्याचे मेंदूतील ठिकाण हे पूर्णपणे परिपक्व झालेले नसते. त्यामुळे लहान मुले तहान लागल्यावर सुद्धा बहुदा खेळण्यात किंवा काही कार्यात मग्न असल्यास पाणी पिणे टाळतात. अल्पशा पाण्याच्या कमतरते ने सुद्धा मुलांमध्ये डोके दुखणे, चिडचिड होणे, लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमी होणे इत्यादी लक्षणे दिसून येतात. त्यामुळे पालकांनी विशेष लक्ष टाकून मुलांना वेळोवेळी आठवण देऊन पाणी पाजणे आवश्यक आहे.
८ वर्षापर्यंत वयाच्या प्रत्येक वर्षाला १ पाव (२५० मिली.) पाणी आवश्यक असते, उदा. ३ वर्षाच्या मुलाला दररोज ३ पाव (७५० मिली) पाणी पिणे आवश्यक असते.
अधिक माहितीसाठी संपर्क साधावा.
स्माईल चिल्ड्रन्स हॉस्पीटल, रामदासपेठ, अकोला